आता समुद्रातून मिळणार पिण्यायोग्य पाणी अन् वीज; आयसरच्या शास्त्रज्ञांनी केलं संशोधन

Sea
Sea

पुणे : महासागर हे पृथ्वीवरील सर्वात मोठे पाण्याचे स्रोत असून याच पाण्याचा वापर आता पिण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेतील (आयसर) शास्त्रज्ञांनी याबाबत नुकतेच संशोधन केले आहे. यामध्ये वीज निर्मिती दरम्यान समुद्रातील पाण्याचे पृथक्करण (खारटपणा आणि रसायनमुक्त करणे) करत गोड्या पाण्याची निर्मिती करण्यास या शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

जीवन जगण्याच्या मूलभूत गरजांपैकी पाणी ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. तर, डब्ल्यूएचओ - युनिसेफ 2019 च्या अहवालानुसार, 2.2 अब्ज लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. यावर उपाय म्हणून 'आयसर' पुणे येथील डॉ. मुस्तफा ओट्टकम थोटीयल यांच्या समूहाने वीज निर्मिती दरम्यान कोणत्याही जंतुनाशकाशिवाय समुद्राच्या पाण्याचे पृथक्करण करण्यासाठी 'इलेक्ट्रोकेमिकल न्यूट्रिलायझेशन सेल' हे नवीन उपकरण विकसित केले आहे. या संशोधनाबाबतची माहिती नुकतीच 'ज्यूल' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार या उपकरणाच्या माध्यमातून समुद्री पाण्यातील खारटपणा तसेच रसायन काढण्यास मदत मिळते. तसेच यासाठी ऊर्जेचा ही वापर जास्त नाही. या संशोधनात दीपराज पांडे, जाहीद भट, नीतू दारगीली, रविकुमार थिम्मप्पा आदींचा समावेश होतो.

"समुद्राचे पाणी खारट असल्याने याचा थेट वापर करणे शक्य नाही. सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या आरओ (रिव्हर्स ऑस्मोसिस), 'इलेक्ट्रोडायलिसिस' आणि 'कॅपेसिटिव्ह डिआयोनायझेशन' अशा तंत्रज्ञानासाठी अत्यंत ऊर्जेची मागणी असते. तसेच यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे पाणी दूषित होण्याचा धोका वाढतो. यासाठी आम्ही 'इलेक्ट्रोकेमिकल न्यूट्रिलायझेशन सेल' या उपकरणाचा वापर केला. हे उपकरण आयसरद्वारे विकसित करण्यात आले असून याच्या माध्यमातून एकाचवेळी समुद्री पाण्यातून वीज निर्मिती तसेच त्याचा खारटपणा दूर करणे शक्य झाले."
- डॉ. मुस्तफा, शास्त्रज्ञ, आयसर

असे झाले संशोधन 
- विविध जलस्रोतांपैकी, समुद्राने पृथ्वीचे 2/3 पृष्ठभाग
व्यापले असून पाण्याचा सर्वात मोठा स्रोत असल्याने यातूनच पिण्यायोग्य पाण्याच्या निर्मितीसाठी साध्या रासायनिक अभिक्रिया प्रणालीचा वापर
- यासाठी 'इलेक्ट्रोकेमिकल न्यूट्रिलायझेशन सेल' उपकरणाचा वापर
- या उपकरणाच्या साह्याने कोणतीही बाह्य ऊर्जा न वापरता समुद्री पाण्यात असलेले सोडियम आणि क्लोराईड घटकांना वेगळं करून रसायनमुक्त पाण्याची निर्मिती करण्यात आली.
- या प्रक्रियेत फक्त वायू, हायड्रोजन आयन (एच+) आणि हायड्रोक्साइड आयन (ओएच-)चा वापर करण्यात आला.
- तसेच प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी केला गेला. 

'इलेक्ट्रोकेमिकल न्यूट्रिलायझेशन सेल'चा फायदा
- उद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारा रासायनिक कचरा पाण्यात सोडण्याऐवजी त्यांचा वापर हे उपकरण विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो.
- या पृथक्करण प्रणालीचा वापर कुठेही केला जाऊ शकतो. (ऊर्जा निर्मिती प्रकल्प, पाणबुडी, उद्योग कारखान्यात)
- एकाच वेळी वीज आणि शुद्ध पाण्याची निर्मिती
- इतर पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत याला कोणत्याही प्रकारची ऊर्जा पुरविण्याची गरज नाही
- पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही
- पावसाळ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com