सिंहगड रस्ता परिसरातील सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पुणे : विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी याबाबतचा आदेश दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सौरभ अरुण तिडके (वय 23, रा. पिराजीनगर, नऱ्हे) असे तडीपार केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके याच्याविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुंड साथीदारांसमवेत राहून घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, वाहन चोरी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याची सिंहगड परिसरामध्ये दहशत असल्याने त्यास सिंहगड पोलिस ठाण्याने तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव गायकवाड यांना पाठविला होता. त्यानुसार, त्यांनी तिडके यास दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal in Sinhagad road area have been tadipar for two years