
दत्तवाडीतील बाल शिवाजी चौकाजवळील ओढ्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एक तरुण पिस्तूल बाळगून कोणाची तरी वाट पाहत थांबला असल्याची खबर दत्तवाडी पोलिसांना मिळाली.
पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल स्वतःजवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस असा 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गोपाळ ऊर्फ रोहित बंडू गवळे (वय 22, रा. समर्थनगर, अप्पर इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दत्तवाडीतील बाल शिवाजी चौकाजवळील ओढ्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एक तरुण पिस्तूल बाळगून कोणाची तरी वाट पाहत थांबला असल्याची खबर दत्तवाडी पोलिसांना मिळाली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कर्मचारी सुधीर घोटकुले, महेश गाढवे, सागर सुतकर, अमित सुर्वे, अक्षयकुमार वाबळे व कुंदन शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून गवळे यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर