अजितदादा खरं बोलले अन् जमिनी लाटलेल्यांना मिरची झोंबली

ajit pava
ajit pava

चाकण (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणग्रस्तांच्या नावाखाली अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अनेकांनी मोक्याच्या जमिनी लाटल्या आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांनी दिले. दादा खरे बोलल्याचे काही धरणग्रस्तांनाही समाधान वाटले, पण काही कार्यकर्त्यांना मिरची झोंबली आणि त्यांनी लोकांना आंदोलनासाठी चिथावणी दिली. 

भामा आसखेड धरणग्रस्तांना जमिनीला जमीन द्या, या मागणीसाठी पुणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीचे काम रोखण्यासाठी नुकतेच आंदोलन झाले. या आंदोलनात काही आंदोलक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. धरणग्रस्तांच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी काहींनी धरणग्रस्तांच्या नावाखाली अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अनेकांनी मोक्याच्या जमिनी लाटल्या आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे आदेश दिले. दादा खरे बोलल्याचे काही धरणग्रस्तांनाही समाधान वाटले, पण काही कार्यकर्त्यांना मिरची झोंबली आणि त्यांनी लोकांना आंदोलनासाठी चिथावणी दिली. काहींनी पडद्यामागे राहून आंदोलन भडकवले. यामध्ये काही पोलिसांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी यात 133 जणांवर वेगवेगळी कलमे लावून गुन्हे दाखल केले.

भामा-आसखेड धरणावरून पुण्यासाठी पाणी जलवाहिनीने नेण्यात येत आहे. आंदोलकांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नाहीत त्यामुळे आंदोलकांनी काम बंद पाडण्याची मागणी केली, परंतु पोलिस बंदोबस्तात काम सुरू झाले. आंदोलकांच्या मागण्यांसाठी आमदार दिलीप मोहिते यांनी पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे काही आंदोलन कार्यकर्त्यांसमवेत यापूर्वी बैठक घेतली. या बैठकीत मोबदला घ्या, जमिनीला जमीन देणे शक्य नाही. तसेच, एजंट व काही कार्यकर्त्यांनी मोक्याच्या ठिकाणी जमिनी मिळविल्या, त्या विकल्या. त्यासाठी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. याची चौकशी करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. 

त्यामुळे ज्या आंदोलन कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोक्याच्या जमिनी मिळविल्या, त्यांचे मात्र पित्त खवळले आणि त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी अजितदादांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्यावर कडवट टीका केली. अगदी पोलिसांनाही काही आंदोलकांनी मारहाण केली व आंदोलन पेटविण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी चिघळलेले आंदोलन योग्य प्रकारे हाताळत आंदोलक, तरुण, जेष्ठ व महिला यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
                                                                       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com