
पुणे - 'घराणेशाहीवर बोलणाऱ्यांनी अगोदर मंत्र्यांचे कर्तृत्व बघितले पाहीजे. मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांना घराणेशाहीच्या आधारावर नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारावर मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे. घराण्याच्या आधारावर एखाद्याच्या कर्तृत्वाचा निर्णय तुम्ही कसा कराल? चांगले काम करणाऱ्यांना संधी दिलेली आहे.' अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला.