

Investment Fraud
sakal
पुणे : शेतमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या मालकास अटक केली आहे. राज्यभर व्याप्ती असलेल्या या प्रकरणात आणखी आरोपी किंवा एजंट सहभागी आहेत का, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.