नगर ःपीकविमा अर्ज भरण्याला शेतकऱ्यांनी पैसे देऊ नका कृषी विभागाचे अवाहन ः ३१ जुलैपर्यत सहभागी होता येणार

नगर ःपीकविमा अर्ज भरण्याला शेतकऱ्यांनी पैसे देऊ नका कृषी विभागाचे अवाहन ः ३१ जुलैपर्यत सहभागी होता येणार
Published on

पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत
ऑनलाइन अर्जाची मुदत

कृषी विभागाचे आवाहन; सीएससी सेंटरला अतिरिक्त शुल्क देऊ नये

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना अहिल्यानगर जिल्ह्यात लागू केली आहे. जिल्ह्यातील भात, बाजरी, भुईमूग, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, मका, उडीद आणि कांदा या दहा पिकांचा यामध्ये समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
शेतकरी राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवर स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँका किंवा सामूहिक सेवा केंद्रामार्फतही अर्ज सादर करता येतील. सीएससी चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज ६० रुपये मानधन दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी विमा हप्त्या व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नका. योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जवळील बँक अथवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेच्या अंमलबजावणी केली जात आहे. साठी इफ्को टोकीयो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नियुक्त केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडलात या वर्षातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देय राहणार आहे. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्‍चित केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. चुकीची माहिती देऊन किंवा चुकीच्या पद्धतीने विमा अर्ज भरून गैरफायदा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या पुढील पाच वर्षांतील कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. पीकविमा अर्जासाठी सातबारा उतारा, नमुना ८-अ, पीकपेरा घोषणापत्र, आधार क्रमांक, तसेच आधारशी संलग्न बँक खाते आवश्यक आहे.
डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत पीक नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष पेरणी केलेले पीक आणि विमा अर्जातील पीक यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेतील नोंद अंतिम ग्राह्य धरली जाईल व तफावत असलेले अर्ज रद्द करण्यात येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्रावर संबंधित पिकाची लागवड असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत विमा योजनेत सहभागी व्हावे. योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यानी विहित मुदतीत संबंधित बँकेस लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

विमा हप्त्याचा शेतकरी हिस्सा व
कंसात संरक्षित रक्कम (हेक्टरी)
कापूस ः १९५० ( ६५,०००)
सोयाबीन ः १२५० (६२,५००)
तूर ः ९४० (४७,०००)
मूग ः ५१५ (२५,७५०)
उडीद ः ५२० (२६ हजार),
भात ः १३०० (६५ हजार ५००),
बाजरी ः ६४० (३२ हजार),
भुईमूग ः ९०० (४५ हजार),
मका ः ८०० (४० हजार),
कांदा ः १५०० (७५ हजार)
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com