ढगफुटी सदृष्य अतिवृष्टी! हवेली परिसरात पिकासह रस्तेही गेले वाहून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जुलै 2020

आमदार अॅड. अशोक पवार यांनी सायंकाळी भर पावसात हवेली प्रांताधिकारी सचिन बावकर, तहसिलदार सचिन कोळी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून तातडीने रस्ता दुरुस्तीसह पिकांच्या नुकसान भरपाईबाबत योग्य त्या  कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत. 

केसनंद : पूर्व हवेलीत मध्यरात्री  ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे अष्टापूर (ता. हवेली) परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्ते वाहून गेल्याने वाडेबोल्हाई ते कोरेगाव मुळ हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तर वाडेगावात वीजेच्या धक्क्याने एक जण मृत्युमुखी पडला आहे. दरम्यान आमदार अॅड. अशोक पवार व प्रांताधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून तातडीने कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत.
अष्टापूर तसेच शिरसवडी, बिवरी, परिसरात गेल्या 25 वर्षात प्रथमच एवढा पाऊस झाल्याने ओढे नाले फुटले तर शेतात पाणी घुसल्याने भुईसपाट झालेल्या पिकाचे 100 टक्के नुकसान झाले. तर पीएमआरडीएचे वाडेबोल्हाई ते कोरेगाव मुळ हा रस्ता वाहून गेल्याने दोन्ही बाजुची वाहतुक बंद झाली असून गोतेमळा ते अष्टापुर गाव हा रस्ता तसेच माळवाडी ते जगताप वस्ती या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी वीज मंडळाचे खांबही पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

पुणेकरांनो, हवेची गुणवत्ता काय हे जाणून घ्यायचंय? मग हे वाचा!

तसेच वाडेगाव, डोंगरगाव परिसरातही अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून वाडेगावात कुंभार वस्तीवर शेळीला वीजेचा धक्का बसल्याने मदतीला गेलेला रामेश्वर पुरी नावाचा एक ३५ वर्षाचा तरूण मृत्युमुखी पडला आहे. नुकसानीबाबत लोकप्रतिनिधिसह संबंधित सर्व यंत्रणांना कळवून स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या कल्पना सुभाष जगताप व पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप तसेच तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, संदीप गोते, सुधीर गोते, रमेश कदम, बाळासाहेब गावडे, सतिश नागवडे, दिपक गावडे, योगेश शितोळे, नितिन मेमाणे, रामदास कोतवाल, दत्ता कटके आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरम्यान आमदार अॅड. अशोक पवार यांनी सायंकाळी भर पावसात हवेली प्रांताधिकारी सचिन बावकर, तहसिलदार सचिन कोळी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून तातडीने रस्ता दुरुस्तीसह पिकांच्या नुकसान भरपाईबाबत योग्य त्या  कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत. पावसामुळे वाहून गेलेल्या वाडेबोल्हाई ते कोरेगाव मुळ या रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येत असून दर्जेदार रस्ते दुरुस्ती तसेच शेतकऱ्यांच्या भुईसपाट झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत योग्य त्या कार्यवाहीच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे शिरूर हवेलीचे आमदार  अॅङ. अशोक पवार यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop losses shirur area villages in Pune District due to heavy rain