
मार्केट यार्ड : पुणे, मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या सहा बाजार समित्यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. याबाबतच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, अधिसूचना कोणत्याही क्षणी निघणार आहे. या धास्तीने बाजार समित्यांमध्ये संचालक मंडळाने आर्थिक लालसेपोटी मालमत्ता विक्री, मोठ्या रकमेच्या निविदा काढण्याच्या कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या सहा बाजार समित्यांमधील निविदा आणि मालमत्ता विक्रीवर बंधने आणण्याबरोबरच याच्या चौकशीची मागणी करणारे पत्र पणन संचालकांना दिले आहे.