

पुणे, ता. १० : पुणे रेल्वे विभागातील दौंड ते मनमाड विभागामध्ये दहा रेल्वेस्थानक अशी आहेत की ज्याच्यावर एकाही रेल्वेला थांबा नाही. यात काष्टी, बेलवंडी, अकोळनेरसारख्या स्थानकांचा समावेश असून, येथे एखाद्या तरी रेल्वे गाडीला थांबा द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पूर्वी हा मार्ग एकेरी होता तेव्हा काही पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे गाड्यांना थांबा होता. आता दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरीही या ठिकाणी गाड्यांना थांबा दिलेला नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक नावालाच अशी स्थिती झाली आहे.