डॉ. भरत शिंदे यांना "क्रॉस डिसीप्लिनरी'' पारितोषिक

मिलिंद संगई
बुधवार, 2 मे 2018

बारामती : येथील विद्या प्रतिष्टानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना "क्रॉस डिसीप्लिनरी” हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

बारामती : येथील विद्या प्रतिष्टानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना "क्रॉस डिसीप्लिनरी” हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सुराणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या बंगलोर येथील संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक नेतृत्व परिषदेत "सर्जनशील नेतृत्वातील सशक्तीकरण नवकल्पना- शिक्षणासाठी शिक्षक" या विषयावर मंथन झाले. या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील नेत्रदीपक संशोधन, अध्ययन व प्रशासन संदर्भात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ. शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. 
त्यांनी शिक्षण, संशोधन व प्रशासन क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याचीही दखल यासाठी घेण्यात आली. त्यांनी अठरा संदर्भ ग्रंथांच लेखन केले असून बाराहून अधिक पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पर्यावरणशास्त्र व जैवतंत्रज्ञान विषयात त्यांचे संशोधन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे.

Web Title: cross disciplinary award to dr bharat shinde