वर्षा विहारासाठी पर्यटकांची भीमाशंकरला गर्दी

वनविभाग व पोलिस प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
Crowd of tourists to Bhimashankar for Rainy wandering
Crowd of tourists to Bhimashankar for Rainy wandering

फुलवडे - आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढला असून निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने परिसराने हिरवाईची झालर पांघरल्यासारखी दिसत असून या भागातील लहान मोठे धबधबे पाण्याने वाहू लागले आहेत. त्यामुळे भीमाशंकर परिसरात वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

पर्यटकांनी धबधबे, ओढे, नदी, नाले, धरण वा इतर पाणवठे याठिकाणी कोणत्याही जीवरक्षक साधन अथवा जीवित सुरक्षा उपाययोजनांची खात्री केल्याशिवाय अशा ठिकाणी जाणे टाळावे. सूर्यास्तानंतर पर्यटनस्थळांवर थांबू नका. रस्ता खचणे, दरड कोसळणे अशा ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. घनदाट जंगलात जंगली श्वापदांचा वावर असून अशा ठिकाणी रस्ता चुकण्याची शक्यता असल्याने एकटे फिरू नका.

अरुंद रस्त्या व अपुऱ्या जागेमुळे वाहनांची पार्किंग दिलेल्या जागीच करा. मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन करून आपल्या व इतरांच्या सहलीचा बेरंग करू नका. महिलांची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने पुढे सोडण्याबाबत पोलिस प्रशासनाशी वाद घालू नका असे आवाहन भीमाशंकर वन अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण तसेच घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com