‘तान्हाजी’मुळे पर्यटकांना सिंहगडाची ओढ...

राजेंद्रकृष्ण कापसे 
मंगळवार, 21 जानेवारी 2020

दरवर्षी जानेवारीत थंडीमुळे आणि परीक्षांचा हंगाम सुरू होणार असल्याने गर्दी कमी असते; पण यंदा गर्दी वाढलेली आहे. त्याला कारणही तसेच आहे. ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडावर गर्दी वाढत आहे. 

खडकवासला - दरवर्षी जानेवारीत थंडीमुळे आणि परीक्षांचा हंगाम सुरू होणार असल्याने गर्दी कमी असते; पण यंदा गर्दी वाढलेली आहे. त्याला कारणही तसेच आहे. ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडावर गर्दी वाढत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाताळनंतर थंडी वाढते, त्यामुळे पावसाळ्यापेक्षा गडावरची गर्दी कमी होते. यंदा मात्र ही गर्दी वाढत आहे.  

गेल्या रविवारी गर्दी नेहमीएवढी होती. शनिवार व आज रविवारी मात्र गर्दी वाढलेली आहे. सकाळी अकरापासून टप्प्याटप्प्याने वाहने गडावर सोडली जात होती. घाटातील शेवटच्या टप्प्यात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कोंढणपूर फाट्यावर वाहतूक थांबविली जात होती. गडावरील वाहने खाली गेली, की पुन्हा अर्ध्या तासाने वाहने सोडली. दर रविवारी सुमारे ३५ हजार रुपये जमा होतात. आज मात्र ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा झाली, असे वनपाल बाळासाहेब जीवडे यांनी सांगितले.

तान्हाजी चित्रपटामुळे नरवीर तानाजी मालुसरे यांची मूळ समाधी कोठे आहे, कशी आहे, हे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. तानाजी कडा कोठे आहे, कोळीवाडा कोठे आहे, याबाबत नागरिक माहिती विचारत असतात, असे उपसरपंच व रहिवासी अमोल पढेर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd on Sinhagad due to Tanhaji movie