पुणेकर करतायेत वाहनांची टाकी फुल; पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी

सनिल गाडेकर
सोमवार, 13 जुलै 2020

- सकाळपासूनच नागरिकांची इंधन खरेदीसाठी गर्दी
-  शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा व पासधारकांना मिळणार इंधन
- सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत पंप खुले

पुणे : शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पंप बंद राहणार असल्याने इंधन खरेदीसाठी आज सकाळपासूनच नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
गर्दी कमी करण्यासाठी शहरातील अनेक आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे. त्यात पेट्रोल पंपचा देखील समावेश आहे. शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बाबी आणि पासधारक व्यतिरिक्त इतर कुणालाही पेट्रोल, डिझेल किंवा गॅस मिळणार नाही, असे महापालिकेने काढलेल्या अध्यादेशात नमूद आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत पंप सुरू राहणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंधन खरेदीसाठी सोमवारी सकाळपासूनच पंपांवर गर्दी केल्याचे पहायला मिळाले. गेल्या लॉकडाऊनमध्ये  इंधन न मिळाल्याने अनेकांचे वांदे झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून आता नागरिक वाहनांची टाकी फुल करून घेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डिझेलची आस्तेकदम दरवाढ : 
या महिन्याच्या सुरुवातीपासून इंधन दरवाढ मंदावली आहे. पेट्रोलचे दर 29 जूनपासून 86.89 रुपयांवर स्थिर आहेत. तेव्हा डिझेल 77.35 रुपये प्रति लिटर होते. सध्या पेट्रोलची किंमत स्थिर असून डिझेल मात्र 50 पैशांनी वाढले आहे. या महिन्यात सीएनजी गॅस देखील एक रुपयांनी महागला आहे.

इंधनाचे दर : 
पेट्रोल 86.89
डिझेल 77.85
सीएनजी  54.80

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

- सकाळपासूनच नागरिकांची इंधन खरेदीसाठी गर्दी
-  शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा व पासधारकांना मिळणार इंधन
- सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत पंप खुले

Edited By : Sharayu Kakade


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of citizens at petrol pumps in Pune duet to lockdown