CTET 2021: 'सीटीईटी' परीक्षेचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; परीक्षा 31 जानेवारीला होणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमास दूरस्थ शिक्षण पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (ता.15) सुरू होत आहे. ​

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी परीक्षा 2021) येत्या 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना 'https://ctet.nic.in' या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) डाऊनलोड करून घेता येणार आहेत, अशी माहिती सीबीएसईने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

'तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इन्साफ नही मिला, माय लॉर्ड'

सीटीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी संबंधित उमेदवारांना अर्ज क्रमांक, जन्म तारीख, सिक्‍युरिटी पिन देणे आवश्‍यक आहे. उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावरून आपले प्रवेश पत्र लवकरात लवकर डाऊनलोड करून घ्यावे. तसेच परीक्षेच्या एक दिवस आधी उमेदवारांनी परीक्षा केंद्राला भेट द्यावी. जेणेकरून परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेत पोचणे शक्‍य होईल, असे आवाहन 'सीटीईटी'चे संचालक आणि 'सीबीएसई'चे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी केले आहे.  

अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दूरस्थ 'एमबीए'चे प्रवेश सुरू 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमास दूरस्थ शिक्षण पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (ता.15) सुरू होत आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किमान दोन वर्षांचा कामाचा, व्यवसायाचा अनुभव असल्यास मुक्त अध्ययन प्रशाळेच्या http://unipune.ac.in/SOL/ या संकेतस्थळावर एमबीए प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी सांगितले.

- ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CTET admit card 2021 released by CBSE download link here