esakal | Coronavirus : कर्फ्यूमुळे जीवनावश्‍यक वस्तू खरेदीकडे कल

बोलून बातमी शोधा

पिंपरी - नागरिकांनी शनिवारी किराणा दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी केलेली गर्दी.

‘सी-व्हिटॅमिन’च्या फळांना मागणी
संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा या ‘सी-व्हिटॅमिन’ असलेल्या आंबट फळांची मागणी बाजारात वाढली आहे. शरीराच्या बळकटीसाठी ही फळे अधिक चांगली असल्याने बाजारात या फळांना सुगीचे दिवस आले आहेत. संत्री ७०, मोसंबी ८० व आवळा १०० रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत या फळांची मागणी तीस टक्‍क्‍यांनी वाढल्याचे आकुर्डीतील भाजी मंडई विक्रेते कमरूद्दीन खान यांनी सांगितले.

Coronavirus : कर्फ्यूमुळे जीवनावश्‍यक वस्तू खरेदीकडे कल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - एका दिवसाच्या जनता कर्फ्यूची घोषणा झाल्याने नागरिकांनी भीतीपोटी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली आहे. अत्यावश्‍यक सेवा सुरू असूनही शनिवारी दूध, भाजीपाला व किराणा खरेदीसाठी स्थानिक दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी गाव, काळेवाडी, कासारवाडी, सांगवी, भोसरी येथील भाजी मंडईत नागरिकांनी सायंकाळी गर्दी केली होती. किराणा व डेअरी चालकांनीही जीवनावश्‍यक वस्तूंची मागणी वाढल्याने जादा मालाचा साठा केला आहे. पालेभाज्या सोडून ढोबळी मिरची, वांगी, कोबी, शेवगा, बटाटा अशा भाज्या खरेदीवर महिलांनी जास्त भर दिला. धास्तीमुळे बऱ्याच गृहिणींनी ३१ मार्चपर्यंत पुरेल एवढ्या प्रमाणात धान्य व भाजीपाल्याचा साठा करून ठेवला आहे.  

चिंचवड व काळेवाडी येथील मॉल सुरू आहेत. मॉलमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी मॉलच्या मागील बाजूने नागरिकांना खरेदीसाठी प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी कुपनचे वाटप केले आहे. दहा-दहाच्या गटाने नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश देत आहेत. हीच शक्कल इतर मॉलनेही लढविली आहे.