
पुणे : सध्याचा कोरोनाचा जो बदल झालेला विषाणू (स्ट्रेन) आहे तो खूपच सौम्य आहे, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) शास्त्रज्ञांनी पुणे महापालिकेला दिली आहे. त्यापासून ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांना काही लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्याबाबत योग्य काळजी घेण्यात येत आहे, असे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.