मार्केट यार्डात सिताफळाचा हंगाम सुरू; दररोज दहा टन आवक

‘बाजारात १० जुलैनंतर सिताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल'
Custard season begins in market yard Ten tons Market inflow pune
Custard season begins in market yard Ten tons Market inflow pune sakal

मार्केट यार्ड : मागील पंधरा दिवसांपासून फळ बाजारात सिताफळाचा हंगाम बहरू लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात आवक वाढत आहे. सध्या बाजारात येणारी सीताफळे लहान आणि जास्त बिया असलेली येत आहे. अद्यापही या फळांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस चांगला झाल्यास दर्जेदार सीताफळांची आवक वाढेल. तसेच मागणीही वाढेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘बाजारात १० जुलैनंतर सिताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल. सध्या एका किलोस घाऊक बाजारात २० ते १६० रुपये भाव मिळत आहे. एका फळाचे ५० ग्रॅमपासून ते ५०० ग्रॅमपर्यंत वजन आहे. तसेच सिताफळामध्ये गराचे प्रमाण कमी आणि बियाचे प्रमाण अधिक दिसत आहे. चांगला पाऊस झाल्यास गराचे प्रमाण वाढून गोडीही वाढेल. तसेच बियांचे प्रमाण कमी दिसत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

सध्या बाजारात दररोज आठ ते दहा टनाची आवक होत आहे. सिताफळाची प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील पुरंदर, वडकी, शिरुर, हवेली तसेच नगर जिल्ह्यातून आवक होत आहे. दररोज चार ते पाच टन एवढीच सध्या आवक होत आहे. सध्या पाऊस कमी असल्याने सिताफळ वजनाने आणि आकाराने कमी दिसत आहे. मात्र चांगला पाऊस झाल्यास सिताफळाचे वजन वाढेल. तसेच त्याची गोडी देखील वाढेल. किरकोळ ग्राहकांशिवाय फळ विक्रेते, ज्यूसविक्रेते, सिताफळ रबडी, बासुंदी या पल्प उत्पादकांकडून मागणी होत असल्याची माहिती सिताफळाचे व्यापारी माऊली आंबेकर यांनी दिली.

सिताफळची मार्केट यार्डात गेल्या दोन आठवड्यांपासून आवक सुरु झाली आहे. हंगाम सुरु झाला असला तरी फळांचा आकार तुलनेने कमी आहे. पावसाची आवश्यकता असून पाऊस झाल्यास मोठ्या आकाराची फळे तयार होतील. त्यामुळे मागणीही वाढेल.’

- युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड

दरवर्षी सिताफळांना दिल्ली, बेंगळुरु, हैदराबाद, गोवा यासाह विविध राज्यांमधून त्याची मागणी असते. सध्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पाऊस झाल्यास सिताफळांची मोठी आवक होणार आहे. सध्या मालाची प्रत चांगली असली तरी पावसानंतर मालाची प्रत आणखी चांगली होण्यास मदत होईल.

- माऊली आंबेकर, सिताफळाचे व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com