

CWPRS and VNIT sign MoU to promote water resources engineering, technical research, and innovation.
Sakal
खडकवासला, ता. २ : पुण्यातील केंद्रीय जल व वीज संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) आणि नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) यांच्यात शैक्षणिक व संशोधन सहयोग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) सोमवारी केंद्रीय जल व वीज संशोधन केंद्र येथे स्वाक्षरी करून औपचारिक केल्याने दोन्ही प्रमुख संस्थांमधील शैक्षणिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. जलसंपदा अभियांत्रिकी आणि प्रगत तांत्रिक संशोधनाला नवे बळ देत पुण्यातील केंद्रीय जल व वीज संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) आणि नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली.