

Share Market Fraud: Two Arrested in Baramati for ₹1.30 Crore Cyber Scam
बारामती : शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत करण्यात आलेल्या सायबर आर्थिक फसवणुकीच्या गुन्हयात बारामती शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणात 1 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद बारामती शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात विविध बँकांशी तत्परतेने पत्रव्यवहार करुन शहर पोलिसांनी आतापर्यंत 44 लाखांची रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे.