Pune Cyber Crime : लग्नाच्या आमिषाने साडेतीन कोटींचा गंडा; पुणे पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला अटक
Matrimonial Fraud : ऑस्ट्रेलियातील डॉक्टर असल्याचे भासवून शादी डॉट कॉमवरून ओळख वाढवून एका महिलेची ३.६ कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली.
पुणे : मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत एका सायबर चोरट्याने महिलेची तब्बल तीन कोटी ६० लाखांची फसवणूक केली. ‘लुकआउट’ नोटीस काढत या आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई विमानतळाहून अटक केली.