

पुणे - शहर आणि परिसरात ऑनलाइन फसवणुकीचे सत्र सुरूच असून, सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या चार गुन्ह्यांमध्ये नागरिकांना सुमारे एक कोटी ४८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यासह विश्रामबाग, भारती विद्यापीठ आणि सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.