सायबर सुरक्षिततेचे माहिती पुस्तिकेद्वारे धडे 

सायबर सुरक्षिततेचे माहिती पुस्तिकेद्वारे धडे 

पुणे - दिल्लीतील किशोरवयीन मुलांनी घडवून आणलेल्या "बॉईज लॉकर रूम' प्रकरणानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) जाग आली. म्हणूनच आता किशोरवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी सीबीएसईने "सायबर सेफ्टी' या मार्गदर्शक पुस्तिकेद्वारे (हॅण्डबुक) सायबर सुरक्षिततेबाबत नियमावली प्रसिद्धी केली आहे. याद्वारे इंटरनेटचा वापर करताना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे. 

काही दिवसांपूर्वी दिल्लीत "बॉईज लॉकर रूम' प्रकरण गाजले. त्यातून साधारणत: 14 ते 18 वर्षे वयोगटातल मुलांकडून इंटरनेटचा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या वापराचा मुद्दा चर्चेत आला. त्यात लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचा ई-लर्निंग, ऑनलाइन क्‍लासेस, शैक्षणिक साहित्य यानिमित्ताने इंटरनेटवरील वावराचा काळ वाढला आहे. हेच विचारात घेऊन "सीबीएसई'ने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजिटलवर वावरताना आपली जबाबदारी ओळखून कसे वागावे, याचे धडे या पुस्तिकेद्वारे दिले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर आणि सूडबुद्धीने केलेल्या अश्‍लिलतेबाबत या पुस्तिकेद्वारे विद्यार्थ्यांना सावध केले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंटरनेटवर शेअरिंग करताना ही घ्या काळजी.... 
- ऑनलाइन संवादाला तुम्हीच जबाबदार असाल. 
- माहिती फॉरवर्ड किंवा पोस्ट करताना सत्यता पडताळा. 
- आक्षेपार्ह आणि अश्‍लील पोस्ट शेअर करू नका. 
- वैयक्तिक माहिती ऑनलाइन माहिती देताना दक्षता घ्या. 
- विश्‍वासार्ह स्रोतांचा वापर करून माहिती डाउनलोड करा. 

"सायबर सेफ्टी' पुस्तिकेचे वैशिष्ट्ये.... 
- डिजिटल साक्षरता, शिष्टाचार, सुरक्षेची सविस्तर माहिती. 
- इंटरनेटचा जबाबदारीपुर्वक वापर करण्याच्या सूचना. 
- गैरप्रकार घडल्यास किंवा ते रोखण्यासाठी संपर्क क्रमांक, स्त्रोतांची यादी. 

ऑनलाइन गेम खेळताना ही घ्या काळजी... 
- गेम निवडताना वयोगटाची अट तपासून घ्या. 
- विनामूल्य गेम डाउनलोड करणे टाळा. 
- एखाद्या क्‍लिकवर, मेसेज किंवा लिंकवरील गेम डाऊनलोड करू नका. 
- वैयक्तिक माहिती व पासवर्ड शेअर करू नका. 
- गेमच्या पूर्णपणे आहारी जात असाल, तर वेळीच सावध व्हा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय आहे "बॉईज लॉकर रूम' प्रकरण 
इन्स्टाग्रामवर "बॉईज लॉकर रूम' नावाचे अकाउंट उघडले होते. यात दिल्लीतील एका नामांकित महाविद्यालयातील अकरावी-बारावीची मुले होते. मुलींबद्दल विकृती निर्माण करणे आणि त्यांचे अश्‍लील फोटो व्हायरल करण्याचे काम या ग्रुपमध्ये सुरू होते. याबाबत दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या एका मुलीने पोस्टवर लिहिले. ही बाब दिल्ली महिला आयोगापर्यंत पोचली. आयोगाने इन्स्टाग्राम आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आणि संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर हे अकाउंट बंद केले. तसेच संबंधित मुलांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com