सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखाला लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंड्री : सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखाला लुटले

उंड्री : सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखाला लुटले

उंड्री : सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात. कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठवून लिंक पाठवून पॅनकार्ड टाईप करायला लावून तब्बल ५ लाखांना गंडा घातला आहे.

हेही वाचा: सानिया म्हणते, नवऱ्याला माजी फिकीरच नाही; व्हिडिओ व्हायरल

याप्रकरणी उंड्री येथील एका ५७ वर्षाच्या गृहस्थाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाइल फोनवर एसबीआय युझर अकाऊंट ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठविला. त्यांना एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करुन नेट बॅकिंग अपडेट करुन तुमचा पॅन नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार या नागरिकाने दिलेल्या लिंकवर जाऊन पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरुन ५ लाख ४ हजार ३४२ रुपये ट्रान्सफर करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. पोलीस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top