Video: डेस्टिनेशन टूरसाठी सायकलची क्रेझ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सायकल चालवून स्वास्थ्या राखण्याबरोबरच भ्रमंतीही केली जाते. म्हणूनच, सायकलीचा वापर मर्यादित न राहता त्याद्वारे डेस्टिनेशन टूरचे नियोजन केले जात आहे. यासाठी सायकल टूरची क्रेझ वाढत आहे.

पुणे - सायकल चालवून स्वास्थ्या राखण्याबरोबरच भ्रमंतीही केली जाते. म्हणूनच, सायकलीचा वापर मर्यादित न राहता त्याद्वारे डेस्टिनेशन टूरचे नियोजन केले जात आहे. यासाठी सायकल टूरची क्रेझ वाढत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रवासादरम्यान आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येईल, हा उद्देश समोर ठेवूनच नेमके कुठे जायचे ते ठिकाण ठरविले जाते. तब्बल ५०० ते तीन हजारांपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास करून आपले आवडते ठिकाण गाठले जाते. पुण्यातील ‘यंग सीनिअर्स ग्रुप’द्वारे नुकतीच कन्याकुमारीला सायकल यात्रा करण्यात आली. या ग्रुपमधील बहुतांश सदस्यांचे वय ६० हून अधिक आहे. ते केवळ १३ दिवसांत कन्याकुमारीला पोचले.

‘‘मी गेल्या दहा वर्षांपासून सायकलचा वापर करतो. सायकलवरून दिवसाला २० किलोमीटर प्रवास करतो. तसेच, इतर राज्यांतही मी सायकलने प्रवास केला आहे. यासाठी पुणे महापालिकेने ‘सायकलवीर’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे,’’ असे सायकलस्वार आनंद वाजपेयी यांनी सांगितले.

आवडती ठिकाणे
कन्याकुमारी आणि लेह-लडाख या देशातील, तर नेदरलॅंड आणि बेल्जियम या परदेशातील ठिकाणी सायकलप्रेमींच्या लिस्टमध्ये अग्रस्थानी आहेत. इतर राज्यांमध्ये राजस्थान, केरळ, गोवा, दिल्ली; तर महाराष्ट्रात लोणावळा, कोकण, रायगड, महाबळेश्‍वर, अजिंठा-वेरुळ या ठिकाणांना पसंती आहे.

जनजागृतीवर भर
आपले मानसिक, शारीरिक आरोग्य आणि स्वस्थ्या कसे ठेवावे, यासह समाजातील विविध प्रश्‍नांसंबंधी प्रवासादरम्यान सायकलस्वार जनजागृती करीत आहेत. महिलांचे सामाजिक प्रश्‍न, शिक्षण, आरोग्य अशा बाबींवर सर्वाधिक जनजागृती करण्यात येत असल्याचे सायकलस्वारांनी सांगितले.

मी गेल्या कित्येक वर्षांपासून ऑफिसला जाण्यासाठी सायकलचा वापर करीत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये तसेच ग्रीस, ऑस्ट्रिया यासारख्या देशांमध्येही सायकलवरून प्रवास केला आहे. केवळ सायकल चालविण्याची आवड आहे म्हणून नाही, तर या भागांमध्ये व देशात फिरताना तेथील शेती, संस्कृती व इतर गोष्टींचाही अभ्यास केला आहे.
- अभिजित कुपटे, आयटी कर्मचारी, पुणे सायकल मेयर 

मला सायकल चालविण्याची आवड आहे. राज्याबाहेर नाही; मात्र नुकताच मी पुणे ते मुंबईचा प्रवास सायकलवरून केला आहे.
- राधिका देशपांडे, अभिनेत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycle craze for destination tours

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: