Cycle Competition on Sinhgad Fort
sakal
खडकवासला - पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित ऐतिहासिक सिंहगडावर २२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान डोंगरउतार सायकल शर्यतीची अंतिम फेरी पार पडली. पुणे दरवाजा ते आतकरवाडी या मार्गावर झालेल्या या स्पर्धेसाठी वन विभागाची परवानगी घेण्यात आली होती; मात्र, शर्यतीचा प्रारंभबिंदू असलेला पुणे दरवाजा आणि त्याखालील पायऱ्यांचा काही भाग पुरातत्त्व विभागाच्या हद्दीत असून, त्यासाठी आयोजकांनी परवानगी घेतलेली नव्हती. दरम्यान, सोमवारअखेर पुरातत्त्व विभागाने आयोजक किंवा वन विभागाकडून अधिकृत माहितीही मागवली नसल्याचे समोर आले आहे.