Pune Cyclist Death : 'आता आमचे अण्णा कधीच घरी येणार नाहीत...'; सायकलस्वाराच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर कोसळलं आभाळ

कृष्णा देवळी फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे मित्राला भेटून सायकलने घरी परतत हाेते आणि त्यांचा कर्वे रस्त्यावर अपघात झाला.
cyclist Krashna Devali crushed by crane at Karve Road pune marathi Latest News
cyclist Krashna Devali crushed by crane at Karve Road pune marathi Latest News

सिंहगड रस्ता, ता. १ : अतिशय वक्तशीर, शिस्तबद्ध, आराेग्यप्रती जागरूक, बुद्धीमान, कामात चाेख, असे कृष्णा गणपत देवळी. आनंदनगर सनसिटी रस्ता परिसरात ते राहत हाेते. कृष्णा देवळी फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे मित्राला भेटून सायकलने घरी परतत हाेते आणि त्यांचा कर्वे रस्त्यावर अपघात झाला.

रूरकी येथून त्यांनी हायड्राॅलाॅजी या विषयात पदव्युत्तर अभियांत्रिकी (एमई) केले. राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागात ते कार्यरत हाेते. अतिशय शिस्तबद्ध असे देवळी हे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून परिचित हाेते. दरराेज सकाळी व्यायामासाठी फिरायला जाणे अथवा सायकल चालविणे हा त्यांचा शिरस्ताच हाेता. दूरदूर सायकलवर जाणे, सिंहगड सर करणे, हे त्यांचे नेहमीचे. गेली कित्येक वर्ष दिक्षीत डाएट ते करत हाेते. व्यायाम आणि याेग्य आहार असला पाहिजे असा त्यांचा खाक्या हाेता. आराेग्याप्रती अतिशय जागरूक हाेते. शासनाच्या पाटबंधारे विभागात त्यांनी नाेकरी केली. संभाजीनगर, पंढरपूर, नाशिक, पुणे येथे त्यांनी आपली सेवा बजावली.

cyclist Krashna Devali crushed by crane at Karve Road pune marathi Latest News
Pune News: कर्वे रोडवर दुर्दैवी अपघात; क्रेनखाली येऊन सायकलस्वाराचा मृत्यू

मुळचे काेल्हापूर जिल्ह्यातील गारगाेटी या गावचे. एक जून 1957 ही त्यांची जन्म तारिख. तर त्यांचा मृत्यू देखील एक जून राेजीच झाला. 2015 साली ते सेवा निवृत्त झाले. पण नेहमी कामात व्यग्र असणाऱ्या कृष्णा देवळी यांना शांत बसणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सेवानिवृत्ती केवळ घेतली पण ‘आयुष्याची सेकंड इनिंग’ त्यांनी जाेमाने सुरू केली. शासनासाठी सल्लागार म्हणून ते काम करीत हाेते. शासनाच्या विविध महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले. अलमट्टी धरण, उजनी धरण इत्यादी कामात त्यांनी विशेष काम केले हाेते. कर्नाटक महाराष्ट्र राज्यांच्या अलमट्टी धरणाच्या काम करणार्‍या समितीत त्यांची वर्णी हाेती.

cyclist Krashna Devali crushed by crane at Karve Road pune marathi Latest News
Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

आपले काम हेच जीवन मानणार्‍या कृष्णा देवळी यांच्या पश्चात पत्नी, उच्चशिक्षीत एक मुलगी, जावई आणि दाेन नाती आहेत. आयुष्याची सेकंड इनिंग अतिशय आनंदात आणि उत्साहात त्यांची सुरू हाेती. दाेन नातींचे ते लाडके आजाेबा हाेते. तर एकुलत्या एक मुलीसाठी ते आदर्श हाेते. तर पत्नी साठी तर ते सर्वस्वच हाेते. जावयावर त्यांचे मुलाप्रमाणेच ममत्त्व हाेते. अशा या परिवारातील ‘अण्णा’ गेल्याने त्यांच्यावर आभाळच काेसळले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com