Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Bombay High Court : उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या व्यक्तिगत हमीवर कळसकरला जामीन मंजूर केला. वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले
Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन  मंजूर
Updated on: 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपी शरद कळसकर याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोघांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. यापैकी वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तीन आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले होते.आता कळसकरला जामीन मंजूर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com