WDJ1102.txt

WDJ1102.txt
Published on

लोगो : अल्‍पपरिचय
----------------

एकनिष्‍ठेचा दीपस्‍तंभ : (कै.) दादासाहेब गोडसे
----------------

स्पष्टवक्तेपणा, परखड विचार अशी खासियत कायम ठेवून, रेशमी सदरा व पांढरे शुभ्र धोतर व पायात बूट अशा पेहरावात, भारदस्त शरीरयष्टीत वावरणारे काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते म्‍हणून दादासाहेब ज्योतिराम गोडसे अनेकांसाठी, काँग्रेस परंपरेसाठी ‘एकनिष्‍ठेचा दीपस्‍तंभ’च ठरले. ९ सप्‍टेंबर १९४२ मध्‍ये झालेल्‍या स्‍वातंत्र्य लढ्याचे ते साक्षीदार होते.
- शब्दांकन : आयाज मुल्ला

गावच्या सरपंच पदापासून ते खरेदी- विक्री संघ, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा राजकीय क्षेत्रांबरोबरच विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ते अण्णा या नावाने ते जिल्ह्यात परिचित होते.
२ एप्रिल १९३३ मध्‍ये त्यांचा जन्म झाला. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्‍या अण्‍णांना कुस्तीची आवड होती. दररोज पहाटे चालण्याच्या व्यायामापासून सुरू झालेली त्यांची दिनचर्या ९५ वर्षांच्‍या वृद्धापकाळातही आहार, विहाराबाबत कायम होती.
ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या हुतात्मा स्मारक समितीच्या माध्यमातून येथील हुतात्मा स्मारकात हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळ्यात त्यांचा पुढाकार होता. १९५१ मध्‍ये ते गृहरक्षक दल (होमगार्ड) मध्ये भरती झाले होते. तालुका कमांडर म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. १९५७ मध्‍ये त्यांनी वडूजच्या सरपंचपदाची जबाबदारी पार पाडली. त्यावेळी मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला होता. १९५९ ते २०१४ अखेर तब्बल ५० वर्षे ते जिल्हा बँकेचे संचालक होते. या काळात ते १६ वर्षे उपाध्यक्षही राहिले. १९६७ ते १९९२ असे सलग २५ वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना, अडीच वर्षे उपाध्यक्षपदही सांभाळले. १९७९ मध्‍ये पंचायत समितीचे उपसभापतीही होते. खटाव तालुका खरेदी- विक्री संघाचे ते माजी अध्यक्ष, तसेच सह्याद्री आणि रयत कारखान्याचे ते माजी संचालक होते. येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. शिवाजी प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दादासाहेब जोतिराम गोडसे महाविद्यालय, छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक अशा संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली होती. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले, विलासराव पाटील (उंडाळकर), माजी आमदार केशवराव पाटील, चंद्रहार पाटील, चिमणराव कदम आदी नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. ६ एप्रिल २०२३ रोजी दादासाहेब अण्णांच्‍या नव्वदाव्‍या वाढदिनी तत्कालीन विरोधी पक्षनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अण्णांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. समाजकारण, राजकारण, कृषी, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केलेल्या कर्मयोगी अण्णांना भावपूर्ण श्रध्दांजली.


-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com