दगडूशेठच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार अरुणाचल प्रदेश आणि पठाणकोटमध्ये !

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात.
Dagdusheth Idol
Dagdusheth IdolSakal
Updated on

पुणे - गणेशोत्सवात (Ganeshotsav) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Dagdusheth Halwai Ganpati) मूर्तीची प्रतिष्ठापना लष्करातील १ आणि ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि पंजाबमधील पठाणकोट (Pathankot) येथे करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी दगडूशेठ हलवाई ट्रस्टने दिलेल्या दोन मूर्ती अरुणाचल प्रदेश व पठाणकोटकडे रवाना नुकत्याच रवाना झाल्या.

ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांनी सैनिकांना ही मूर्ती सुपूर्द केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतच असे नाही. त्यामुळे १ मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार आणि ६ मराठा बटालियनचे विनोद पाटील यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्यावतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते.

Dagdusheth Idol
Army Recruitment Case : प्रकरण स्वतःकडे घेण्यास लष्कराची असमर्थता

कर्नल जयकुमार मुदलियार यांनी पत्रात म्हटले की, पुण्यातून आमची बटालियन टेंगा व्हॅली, अरुणाचल प्रदेश येथे चायनीज बॉर्डर परिसरात जात आहे. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना आम्ही तेथे करु इच्छितो.

कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले की, सन २०११ पासून ६ मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. पठाणकोट सिमेवर गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल. त्यानुसार मूर्ती सुपूर्द करण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
The protesters also expressed support for the ongoing Jantar Mantar agitation and condemned the alleged police action against students in Delhi.
The CBI is investigating the cases, and the government says it is committed to protecting students' interests and ensuring transparency in competitive examinations.
The Pune Fire Brigade reported 372 tree fall incidents across the city between July 1 and July 23.
Marathi News Esakal
www.esakal.com