पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 मे 2020

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुण्यात आल्यावर दगडूशेठच्या गणपतीचे दर्शन 99 टक्के भाविक घेतातच.

पुणे : पुण्यातच नव्हे तर देशात आणि देशाबाहेरील भाविकांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन 8 जूनपासून शक्य होणार आहे. फक्त त्यासाठी आता राज्य सरकारच्या सुधारीत आदेशाची वाट पाहवी लागणार आहे.

आणखी वाचा - पुणेकरांनो वाचा लॉकडाउन5च्या गाईडलाईन्स 

केंद्र सरकारने पाचवा लॉकडाउन वाढविताना मंदिरे, मॉल्स आणि हॉटेल्स 8 जूनपासून खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देशार्तंगत आणि जिल्हातंर्गत वाहतूकही खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र शाळा, महाविद्यालये 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच थिएटर, बार, जिम, मेट्रो आदींवरीलही निर्बंध कायम राहणार आहेत. पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुण्यात आल्यावर दगडूशेठच्या गणपतीचे दर्शन 99 टक्के भाविक घेतातच. म्हणूनच या मंदिरात दर्शनासाठी अगदी भल्या पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत भाविकांची गर्दी असतेच. केंद् सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 8 जूनपासून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन भाविकांना घेणे शक्य होण्याची चिन्हे आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या बाबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, केंद् सरकारने 8 जूनपासून मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, राज्य सरकारने या बाबत सुधारित आदेश काढल्यावर या निर्णयाची अंमलबजावणी शक्य होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत.

आणखी वाचा - पुण्यातून कोरोना संदर्भात एक चांगली बातमी 

पुण्याच्या पूर्वभागात काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) असला तरी, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे मंदिर त्या बाहेर आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनचे नियम या मंदिराला लागू होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. आंतरराज्य आणि राज्यातंर्गत वाहतूक खुली करण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगीची गरज नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन  राज्य सरकार ही वाहतूक नियंत्रित करू शकते. विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक या पूर्वीच्या निर्णयानुसार सुरू राहणार आहे. माल वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतील, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे परजिल्ह्यातूनही भाविक आता दगडूशेठ हलवाई गणपीचे दर्शन घेण्यासाठी येऊ शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dagdusheth halwai temple will reopen lockdown 5