Pune Dahihandi DJ Sound Dystem
sakal
पुणे - यंदाच्या दहीहंडी उत्सवाने आगामी गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाची भीषण दाहकता आणि नियमांच्या उल्लंघनाची दिशा स्पष्ट केली आहे. प्रशासनाचे कडक प्रतिबंध आणि कायद्याचे इशारे धाब्यावर बसवत शहरातील दहीहंडी मिरवणुकांमध्ये डीजेच्या अवाजवी दणदणाटाने विहित मर्यादांचे उल्लंघन केल्याचे ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत समोर आले आहे.