esakal | शाळा आजपासून भरणार 'टीव्ही'द्वारे
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा आजपासून भरणार 'टीव्ही'द्वारे

- सह्याद्री वाहिनीवर दररोज पास तासांच्या तासिकांचे वर्ग

- आठवड्यातून पाच दिवस असेल ‘टीव्ही’वरील ही शाळा

शाळा आजपासून भरणार 'टीव्ही'द्वारे

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : तुमच्या मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचत नसेल म्हणून किंवा ऑनलाइन शिक्षणाबरोबरच टेलिव्हजनद्वारे (टीव्ही) दिल्या जाणाऱ्या शिक्षणात मुले सहभागी होणार असतील तर, मुलांची ‘टिव्ही’द्वारे शाळा सोमवारपासून (ता. १४) भरणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही शाळा असणार आहे. होय, शालेय शिक्षण विभागाने अधिकृतरित्या राज्यातील सर्व शाळा मंगळवारपासून (ता. १५) सुरू होणार असल्याचे जाहीर केले असले, तरीही ‘टिव्ही’द्वारे शाळा त्याआधी एक दिवस सुरू होणार आहे. (daily classes on dd sahyadri channel for students)

शाळा नेमक्या कधी सुरू करायच्या याबाबत मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनामध्ये गोंधळ होता. शिक्षण विभागाने सुधारित परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून ऑनलाइनद्वारे सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यात विविध निर्बंध लागू आहेत. यामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. परिणामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डी. डी. सह्याद्री वाहिनी’वरून १४ जूनपासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज पाच तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण होणार आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या ‘www.maa.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.

‘डी.डी. सह्याद्री वाहिनी’वर अशी भरेल शाळा :

- १४ जूनपासून भरणार शाळा

- वेळ : सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० पर्यंत

- प्रक्षेपणाचे दिवस : दर सोमवार ते शुक्रवार

- नियोजित बातम्यांची वेळ वगळता शैक्षणिक कार्यक्रम होईल प्रक्षेपित

- पहिला टप्पा : इयत्ता दहावीसाठी मराठी व इंग्रजी माध्यम, तर इयत्ता बारावीच्या तिन्ही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू होईल

- दुसरा टप्पा : उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण लवकरच होणार सुरू

loading image