हडपसर - आज दिवसभर होत असलेल्या जोरदार पावसामुळे हडपसर-मांजरी- महंमदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दैनावस्था निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर साठलेले पाणी, काही घरांमध्ये व कार्यालयासमोर साठलेले पाणी, वाहतूक कोंडी, पडलेले खड्डे आणि तुंबलेली गटारे यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.