...म्हणून शेतकरी म्हणतायेत, दखल घेणार कोण?

kaldari.jpg
kaldari.jpg

परिंचे (पुणे) : परिसरात झालेल्या अतिवृष्टीची माहिती कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना कळविण्यात आली. पण संपूर्ण दिवसभरात एकही अधिकारी पाहणी करायला अथवा चौकशी करायला आला नाही. सरपंच पुण्यात रहायला. मग आमची दखल घेणार कोण, असा सवाल दवणेवाडी (ता. पुरंदर) येथील शेतकरी विचारत आहे. 

काळदरीत झालेल्या अतिवृष्टीमुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या असून विहिरी गाळाने भरल्या आहेत. महसूल व कृषी विभागाने या परिसरात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहूरकर यांनी केली आहे. 

परिसरातील अनेक तरुण नोकरी धंद्यासाठी पुणे, मुंबई येथे जातात. कोरोनाच्या भीतीपोटी अनेक जण गावाला आले असून वडिलोपार्जित शेती करत आहेत. शेती करताना अतिवृष्टी सारखे संकट अचानक आल्यामुळे येथील भात उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याची भावना दवणेवाडी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी निवृत्ती जाधव, शहाजी धुमाळ, संजय धुमाळ, सुनंदा धुमाळ, दिलीप यादव, फुलाबाई धुमाळ, सुशीला धुमाळ, संभाजी धुमाळ, विनायक जाधव, कुंडलिक जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. 
 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेमके काय झाले? 
- काळदरी, धनकवडी, दवणेवाडी, मांढरे परिसरात गुरुवारी रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस 
- तब्बल दोन तास मुसळधार पाऊस कोसळला 
- कधी नव्हे एवढे पाणी डोंगर माथ्यावरून वाहून आले 
- भात शेतीबरोबरच बाजरी, भुईमूग, कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 
- शेताचे बांध फुटून शेतजमिनी वाहून गेल्या 
- अनेक ठिकाणी दगडी ताली पडल्या 
- परिसरातील विहिरी मातीने बुजून गेल्या 
- विद्युत पंप, पाणी उपसा इंजिनांचे नुकसान 
- ओढ्यावरील अनेक बंधारे फुटले, पाणी शेतात घुसले 
- अनेक ठिकाणी ओढ्यातील प्रवाह बदलला 

 

कृषी सहायकांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून लवकरात लवकर या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात येणार आहेत. 
- संजय फडतरे, कृषी मंडल अधिकारी 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com