#FridayMotivation पुण्याची दामिनी एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

दामिनी देशमुख हिची भारतीय वायुदलातील फ्लाइंग ऑफिसर पदासाठी निवड झाली असून, या परीक्षेत ती राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आली आहे.

पुणे : दामिनी देशमुख हिची भारतीय वायुदलातील फ्लाइंग ऑफिसर पदासाठी निवड झाली असून, या परीक्षेत ती राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दामिनी हिचे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत झाले असून, ती अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. मेकॅनिकल पदवी उत्तीर्ण झाली आहे. फ्लाइंग ऑफिसर पदासाठी ‘एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट’ घेतली जाते. यासाठी देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थी परीक्षा देतात. त्यापैकी दीड ते दोन हजार विद्यार्थी यशस्वी होतात. त्यानंतर समूह चर्चा, नेतृत्व गुण, परिस्थिती हाताळणे, मैदानी खेळ अशी व्यक्‍तिमत्त्व चाचणी घेतली जाते. त्यानंतर ‘एअरफोर्स सिलेक्‍शन बोर्डा’कडून मुलाखत घेतली जाते. या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण तीन ते चार टक्‍के इतके आहे.

हैदराबाद येथील एअरफोर्स ॲकॅडमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ती फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू होईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी ती रवाना होणार आहे. पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्‍त दिलीपराव देशमुख यांची दामिनी ही मुलगी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damini Deshmukh selection for the post of Flying Officer

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: