damini marshal sonali hinge
sakal
पुणे - शाळेत हुशार असलेली इयत्ता सातवीतील एका विद्यार्थिनीने आठ दिवसांपासून शाळेत येणे बंद केले होते... शिक्षिकेने चौकशी केली असता, त्या विद्यार्थिनीच्या मैत्रिणींकडून समजले की पालक तिचे लग्न ठरवण्याच्या तयारीत आहेत. यावर शाळेतील शिक्षकांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, आणि पुढे जे घडले, ती फक्त पोलिसी कारवाई नव्हती, तर ती एका कुटुंबाच्या विचारसरणीत बदल घडवणारी महत्त्वपूर्ण बाब ठरली.