धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जादा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 August 2019

धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या धरणांत यंदा मुसळधार पाऊस पडला आहे. पाणलोट क्षेत्रात सरासरी २५ ते ५० टक्के जादा पाऊस पडला आहे. 

खडकवासला - धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या धरणांत यंदा मुसळधार पाऊस पडला आहे. पाणलोट क्षेत्रात सरासरी २५ ते ५० टक्के जादा पाऊस पडला आहे. 

चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. सुमारे २९.१५ टीएमसी पाणी जमा झाले असून, मुठा नदीत २० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

आंबी नदीवर १९६० च्या दशकात पानशेत धरण बांधले. त्यामध्ये १०.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मोसे नदीवर वरसगाव धरण १९८० च्या दशकात उभारले असून १२.८२ टीएमसी उपयुक्त पाणी साठा जमा होतो. मुठा नदीवर १९९० च्या दशकात टेमघर धरण बांधले आहे. यामध्ये ३.७१ टीएमसी पाणी जमा होते. इंग्रजांनी मुठा नदीवर १८३९ मध्ये खडकवासला धरण उभारणीस सुरवात केली. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर नदीपात्रातील खडकवासला धरणाच्या भिंतीचा भाग फोडला होता. पूर्वी या धरणाचे दरवाजे स्वयंचलित होते. आता भिंतीचा भाग व सांडव्याच्या भाग नव्याने उभारला आहे. या धरणात १.९७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा होतो.

या चारही धरणांत २८ जून रोजी २.२० टीएमसी म्हणजे ७.५४ टक्के किमान पाणीसाठा होता. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात एक जूनपासून नवीन साठा मोजण्यास सुरवात केली जाते. गेल्या काही वर्षांत पडलेल्या पावसावरून पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाची सरासरी काढली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dams in an average of 50 per cent excess rainfall