Temghar Dam
sakal
पुणे - पुण्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणे काठोकाठ भरली आहेत. भीमा खोऱ्यातील २५ धरणांपैकी नऊ धरणे १०० टक्के भरली असून, चार धरणे ९९ टक्क्यांवर पोहोचली आहेत, तर १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणेकरांसाठी दिलासा मानला जात आहे.