esakal | मळदमधील रस्त्यांची झालीये चाळण कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

malad.jpg

मळदमधील बेकायदा उपसा बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी 

मळदमधील रस्त्यांची झालीये चाळण कारण...

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ (पुणे) : मळद (ता. दौड) येथील ओढ्यातून बेकायदा उपसा केलेल्या वाळूची वाहतूक लोकवस्तीतील रस्त्यांवरून होत आहे. या अवजड वाहतुकीमुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा उपसा त्वरित बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मळदला ओढ्यातून व लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतातून जेसीबी, ट्रॅक्‍टरच्या साहायाने बेकायदा वाळू उपसा होत आहे. या उपसा केलेल्या वाळूची अवजड वाहतूक गावातील वेगवेगळ्या रस्त्यांवरून केली जाते. त्यामध्ये गावठाण व जाधववस्ती हद्दीतील सिमेंट कॉंक्रिट रस्ते, गाव ते पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा डांबरीरस्ता, महामार्ग सेवा रस्ता, मुरमीकरण केलेल्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामासाठी ग्रामस्थांच्या करातून जमा झालेल्या पैशातून लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा किती तरी पटीने अधिक अवजड वाळू वाहतूक होत आहे. 

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...


अशी होते रस्त्याची दुरवस्था... 
1. वाळूतील पाण्यामुळे रस्ते ओले होतात. 
2. सिमेंट रस्त्यांना तडे जाणे. 
3. भेगा पडून रस्ता खचणे. 
4. खड्डे पडू लागले आहेत. 
5. डांबरी रस्त्यांचीही हीच अवस्था 


गुन्हा दाखल करण्याची मागणी 
उपसा केलेल्या वाळूचा साठा करून तीच वाळू ट्रकमध्ये भरून पाठवली जाती. ही अवजड वाळूने भरलेली वाहने लोकवस्तीतून जात असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उपसा त्वरित बंद करावा. तसेच वाळू वाहतूक व उपसा करणाऱ्यावंर गुन्हा दाखल करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 
 

loading image
go to top