
Dangerous Anganwadis in Pune Children's Safety at Stake
esakal
मयूर कॉलनी : शहरातील अनेक अंगणवाड्या अत्यंत धोकादायक अवस्थेत सुरू असून लहान मुलांचे शिक्षण आणि आरोग्य धोक्यात आले आहे. पांडवनगर येथील अंगणवाडी मागील महिन्यात कोसळली होती. या वेळी विद्यार्थी उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली. कोथरूडमधील संत ज्ञानेश्वर कॉलनी येथील अंगणवाडी क्रमांक ७१ ही भाड्याच्या धोकादायक खोलीत भरते, तर अंगणवाडी क्रमांक ७२, ७३ ही विठ्ठल मंदिरात भरते, जवळपास अशीच स्थिती शहरात विविध ठिकाणी आहे.