
पुणे : कुंडमळा येथील लोखंडी पूल पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व साकव पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना यापूर्वी संबंधित विभागांना दिल्या होत्या. त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार जे धोकादायक साकव पूल असतील, ते तातडीने पाडण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिली.