
धायरी : मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळवाडी दरी पुलापासून, भूमकर चौक, स्वामी नारायण मंदिर नवले पूल आणि वडगाव पूल परिसरात मागील तीन वर्षांत अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या मार्गावरील उतारामुळे वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जातो आणि त्यामुळे गंभीर अपघात घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासी करत आहेत.