पूर्व हवेलीत वाढतोय धोक्याचा आलेख, आणखी एकाला...

जनार्दन दांडगे
बुधवार, 27 मे 2020

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे तीन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या पन्नास वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ नातेवाईकांपैकी संबधित रुग्णाचा एकविस वर्षीय पुतण्या कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे तीन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या पन्नास वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ नातेवाईकांपैकी संबधित रुग्णाचा एकविस वर्षीय पुतण्या कोरोनाबाधित असल्याचे बुधवारी (ता. २७) सायंकाळी आढळून आले आहे. तसेच, उर्वरित सात नातेवाईकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

कोरेगाव मूळ येथे सोमवारी आढळून आलेला पन्नास वर्षीय कोरोनाबाधित कामगार हा हडपसर येथील नामांकित कंपनीचा कामगार आहे. मागिल आठ दिवसांच्या कालावधीत या कंपनीशी निगडित असणारे मांजरी बुद्रुक, आंळदी म्हातोबाची व कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीमधील तब्बल आठ कामगार व तीन नातेवाईक, असे अकरा जण कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत भितीचे वातावरण पसरले आहे. 

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!

हडपसर येथील नामांकित कंपनीत काम करणारे कोरेगाव मूळ येथील एक पन्नास वर्षीय कामगाराचा कोरोना अहवाल सोमवारी (ता. २५) पॉझिटीव्ह आला होता. या वेळी उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी तातडीने या कामगाराच्या घरातील आठ नातेवाईकांची कोरोना टेस्ट केली होती. यात सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, एकवीस वर्षीय पुतण्या मात्र पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 

ना बॅंण्डबाजा, ना वरात...! लाॅकडाउनमधील लग्नांचा आळंदी पॅटर्न

याबाबत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी माहिती दिली की, हडपसर परिसरातील एका नामांकित कपंनीमधील काम करणारे चार व एका कामगाराची पत्नी, असे पाच जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी रात्री उशीरा निष्पन्न झाले आहे. कोरेगाव मूळ येथील कामगाराचा पुतण्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी सायंकाळी समजले आहे. या कंपनीशी निगडित मंगळवारी आढळून आलेल्या चारही कामगारांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व घरातील सदस्य, अशा सर्वांची कोरोना टेस्ट करण्यासाठी पुण्यातील शासकीय रुग्नालयात हलविले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कदमवाकवस्तीत भाजीपाला विक्रेत्यांमुळे धोका 
कदमवाकवस्ती हद्दीत मागिल दोन महिन्यापासून चालू असलेल्या लॉकडाउनच्या काळात स्थानिक भाजीपाला विक्री करणाऱयांबरोबर हडपसर भागातून आलेले अऩेक भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करत आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही भाजीपाला विक्रेत्यांच्या नियंत्रण आलेले नाही. भाजीपाला विक्रेते व खरेदी कऱणारे स्थानिक नागरिक शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करत नाहीत. त्यामुळे भाजीपाला विक्री कऱणारे कोरोनाला पायघडी घालणार, हे नक्की. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous graph is increasing in Haveli taluka, another one is infected with corona