Pune News: भर पावसात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल
Monsoon Update: किल्ले तोरणा व राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास चालू असून याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वेल्हे : किल्ले तोरणा व राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जोरकरवाडी ते मेटपिलावरे (ता. राजगड) येथील पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास चालू असून याबाबतचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.