कात्रज घाटात तिसऱ्यांदा कोसळली दरड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Darad collapsed for the third time in Katraj Ghat

कात्रज घाटात तिसऱ्यांदा कोसळली दरड

कात्रज - परिसरात मुसळधार पाऊस सुरु असताना बुधवारी (ता. १३) दुपारच्या वेळी कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. रस्यावर दगडे आली होती. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाचे आपत्ती निवारण पथक याठिकाणी रवाना झाले. त्यांच्याकडून रस्त्यांवरील दगडे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्याची माहिती धनकवडी सहायक आयुक्त विजय वाघमोडे यांनी दिली.

डोंगरावरुन चार ते पाच मोठे दगड खाली आले होते. त्यापैकी दोन दगड रस्त्याच्या मधोमध होते. सुदैवाने यामध्ये कोणताही अपघात झाला नाही. मात्र, काही काळासाठी वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणांवर पाऊस पडत आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील १५ दिवसांतील कात्रज घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.

कात्रज घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा असून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हात वर करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अशावेळी दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.

Web Title: Darad Collapsed For The Third Time In Katraj Ghat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..