
सिंहगड रस्ता : येथील वडगाव येथे चोरीच्या उद्देशाने भर रस्त्यात भर दिवसा सराफी दुकानात दरोडा टाकण्यात आला. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडगाव रेणुका नगरी परिसरात पाउंजाई मंदिराकडून दुचाकी वर चेहरे बांधलेले तीन तरुण हातात कोयता आणि बंदूक घेऊन आले.