Police Officer Kishor jadhav
sakal
बारामती - महाराष्ट्र पोलिस दलात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे निवृत्त पोलिस महानिरीक्षक किशोर जाधव (वय-70) यांचे पुण्यात शनिवारी (ता. 12) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. किशोर जाधव यांनी पोलिस सेवेत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, लाचलुचपत प्रतिबंध तसेच मानवी हक्कांचे संरक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केले.