cars buying
sakal
पुणे - दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांनी यंदा वाहन खरेदीत मोठा उत्साह दाखवला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार २१ ते २९ सप्टेंबरदरम्यान नऊ हजार ५३१ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे.
वाहनखरेदीत पाच हजार ४३८ दुचाकी, दोन हजार ५५४ चारचाकी गाड्या, तसेच ३६१ मालवाहतूक वाहने, १९१ पर्यटन टॅक्सी, ६९ रिक्षा, १७ बस आणि ८७ इतर वाहनांचा समावेश आहे. त्याचबरोबर यावर्षी इलेक्ट्रिक वाहनांचीही लक्षणीय भर पडली आहे.