दसरा विशेष : रावणाच्या लंकेचं दहन रागसंगीतातही!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

दसऱ्यापूर्वीचा काळ हा भारतीय लोकजीवनात पारंपरिक पद्धतीने रामकथा सांगण्याचा असतो. यंदा कोविडपासून बचावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी जाहीर कार्यक्रम नाहीत. मात्र, काही ठिकाणी सामाजिक माध्यमांतून रामकथा गीत अथवा नाट्यरूपात सादर केली जात आहे. आग्रा घराण्याचे गायक डॉ. विकास कशाळकर यांनी या संदर्भात भारतीय शास्त्रीय संगीतातील लंकादहन रागाचं वैशिष्ट्य सांगितलं आहे.

पुणे - दसऱ्यापूर्वीचा काळ हा भारतीय लोकजीवनात पारंपरिक पद्धतीने रामकथा सांगण्याचा असतो. यंदा कोविडपासून बचावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी जाहीर कार्यक्रम नाहीत. मात्र, काही ठिकाणी सामाजिक माध्यमांतून रामकथा गीत अथवा नाट्यरूपात सादर केली जात आहे. आग्रा घराण्याचे गायक डॉ. विकास कशाळकर यांनी या संदर्भात भारतीय शास्त्रीय संगीतातील लंकादहन रागाचं वैशिष्ट्य सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कशाळकर म्हणाले, ‘‘हा प्राचीन रागप्रकार आहे. वृंदावनी सारंग या रागाच्या अवरोहात धैवत आणि कोमल गंधार लावल्यास लंकादहन सारंग होतो. याचा उगम, उत्तर भारतातील रामपूर भागात पूर्वी गायल्या जाणाऱ्या लोकधूनमधून झाला आहे. त्या परिसरात कथारिया राजपूत हे संस्थानिक होते. त्यांनी शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन दिलं. तेथे उत्सवात लोकधून गायल्या जात. त्यातून रागरूपात बंदिशी बांधायची स्फूर्ती तेव्हाच्या अभ्यासू कलावंतांनी घेतली असणार. ‘चरण तक आयो, लाज मोरी राखो, मैं तुमपर जाऊं वारी, बलिहारी,’ अशी बंदिश मिळते. पंडित भातखंडे यांनी लिहिलेल्या, ‘हिंदुस्तानी संगीत पद्धती’ या क्रमिक पुस्तकाच्या सहाव्या भागात लंकादहन रागाबद्दल माहिती दिलेली आहे. या रागात आलेलं राग देसीचं चलन हे धूनरागातून आलेलं आहे. आग्रा घराण्याचे कलावंत उस्ताद विलायत हुसैन खाँ लंकादहन सारंग सादर करायचे.’

लग्नाचे फोटो न देणे फोटोग्राफरच्या अंगाशी; दंड म्हणून द्यावे लागणार दोन लाख रुपये!

कशाळकर यांनी आवर्जून सांगितलं की, रामायणातील वर्णनं लोकसंस्कृतीतील कलाप्रकारांमध्ये प्रस्तुत केली जातात. रामभक्त  हनुमानाच्या शेपटीला रावणाकरवी आग लावली गेली आणि मग त्याने शेपटी आपटत सुवर्णनगरी लंका जाळली, हा प्रसंग दुपारी घडला असावा, असं अनुमान काढलं गेलं असेल. त्यावेळी गायल्या जाणाऱ्या वृंदावनी सारंग रागात देसीचं चलन मिसळण्यामागे, विशुद्ध शास्त्रीय व लोकजीवनातील जवळच्याच सुरावटींचा संगम, हा विचार बहुतेक असू शकतो. या रागस्वरूपात शांतरस आहे. भक्तिसंगीताचा भाग म्हणून तो तसा घेतला असावा. पण, मी यातूनच प्रेरणा घेऊन रौद्ररस दाखवणारं काव्य लिहिलं आणि ती बंदिश तिलक कामोद रागात बांधली. ती अशी, ‘बुभुत्कार करे बजरंग, लंका जरावै, बिकट रूप धरे, रुद्र कपिस देख, अचरज रावण, भयकंपित भये सबजन दंग.’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dasara Special dr vikas kashalkar